इराणी चषकात 5 विकेट घेत दाखवले वर्चस्व; या गोलंदाजासाठी उघडणार टीम इंडियाचे दरवाजे
इराणी चषक स्पर्धेत मुंबई आणि उर्वरित भारताचे संघ आमने-सामने येणार आहेत. मुंबईने पहिल्या डावात एकूण 537 धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी संघासाठी मोठी धावसंख्या उभारली. मुंबई संघाकडून सरफराज खानने शानदार द्विशतक झळकावले. तर, उर्वरित मुंबईसाठी मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने एकूण 5 विकेट घेतल्या.
मुकेश कुमारची दमदार कामगिरी
मुकेश कुमारची ईराणी चषकात 5 विकेट
मुकेश कुमारने रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध 5 विकेट घेतल्या. त्याने पहिले तीन फलंदाज बाद केले. मुकेशने प्रथम पृथ्वी शॉला बाद केले. यानंतर त्याने आयुष म्हात्रे आणि हार्दिक तामोरे यांची विकेट घेतली. त्यानंतर त्याने शम्स मुलाणी आणि जुबेर खान यांचीही विकेट घेतली. अशा प्रकारे मुकेशने एकूण 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. 30 षटकांत गोलंदाजी करताना त्याने 110 धावा दिल्या.
मुकेश कुमार भारताच्या कसोटी संघाचा भाग
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत मुकेश कुमार भारताच्या कसोटी संघाचा भाग होता, त्याला मालिकेत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या डावात एकही विकेट घेण्यास तो चुकला, पण, दुसऱ्या डावात इंग्लिश फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी ठरला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत मुकेशला संधी मिळाली नाही. तो संघाबाहेर होता.
न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळेल का?
बांगलादेशनंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत मुकेशला संधी मिळेल का? हे पाहणे मनोरंजक असेल. न्यूझीलंडचा संघ १६ ऑक्टोबरपूर्वी भारत दौऱ्यावर येणार आहे. 16 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी 16 ऑक्टोबर, दुसरी 24 ऑक्टोबर आणि तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून खेळवली जाईल.
