Explore

Search

April 12, 2025 7:49 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Irani Cup : पृथ्वी शॉ ला सूर गवसला

रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध तडाखेदार अर्धशतक

इराणी कप स्पर्धेतील सामन्यात चौथ्या दिवशी मुंबईच्या पृथ्वी शॉ याने रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध अर्धशतक केलं आहे. अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या या युवा खेळाडूला या सामन्यातील पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. पृथ्वी 7 चेंडूत 4 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे पृथ्वीवर टीका करण्यात आली. मात्र पृथ्वीने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केलं. पृथ्वीने आयुष म्हात्रेसह अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला आश्वासक सुरुवात करुन दिली. त्यानंतर पृथ्वीने अर्धशतक ठोकलं.

पृथ्वीचं अर्धशतक

पृथ्वी आणि आयुष या दोघांनी पहिल्या विकेटसाठी वेगवान सुरुवात केली. या दोघांनी 7.2 ओव्हरमध्ये 52 धावा जोडल्या. त्यानंतर आठव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर आयुष म्हात्रे 14 धावा करुन माघारी परतला. आयुषनंतर हार्दिक तामोरे मैदानात आला. पृथ्वीने हार्दिकसह मुंबईचा धावफलक हलता ठेवला. त्यानंतर पृथ्वीने 12 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर फोर ठोकत फक्त 37 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. पृथ्वीच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे 18 वं अर्धशतक ठरलं. पृथ्वीने 135.1 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं.

मुंबईला 121 धावांची आघाडी

दरम्यान रेस्ट ऑफ इंडियाने मुंबईच्या 537 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात सर्वबाद 110 षटकांमध्ये 416 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 121 धावांची आघाडी मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरन याने 191 धावा केल्या. तर ध्रुव जुरेल याने 93 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त ईशान किशन 38, साई सुदर्शन 32 आणि देवदत्त पडीक्कल याने 16 धावांचं योगदान दिलं. इतर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर शेवटच्या 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. मुंबईकडून तनुष कोटीयन आणि शम्स मुलानी या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मोहित अवस्थीने दोघांना बाद केलं. तर एम खान याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.

रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy