Explore

Search

April 16, 2025 1:11 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

A Terrible Fire : मुंबईत माहीम परिसरातील रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग

मुंबई : मुंबईतील माहीम परिसरातील एका रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. मोहित हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. इमारतीमध्ये काही रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शर्थीचे प्रय्तन करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि अखेर ती विझवली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच बचावकार्याला वेग आला.

ही आग एवढी भीषण आहे की घरातील सर्व सामानही जळून खाक झालं आहे. ज्या इमारतीत आग लागली तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सध्या जवानांना आग विझवण्यात यश आलं आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र यात घराचं, सामानचं बरंच नुकसान झालं असून आगीमुळे अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy