Explore

Search

April 13, 2025 12:56 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health : जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमियाच्या औषधांचा तुटवडा

अडीच महिन्यात साठाच नाही; शासन पातळीवर उदासीनता

सातारा : जीवन मरणाशी सततचा संघर्ष करणार्‍या थॅलेसेमिया रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत शासन पातळीवर उदासीनता आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात यावरची औषधे उपलब्ध नसल्याने सातार्‍यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. या रुग्णांची बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठीची परवड थांबवण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

थॅलेसेमिया हा अतिशय गंभीर असा अनुवंशिक आजार आहे. यामध्ये बालकांच्या शरीरात जन्मतःच रक्त तयार होत नसते. त्यामुळे या बालकांना 15 ते 21 दिवसांतून रक्ताची पिशवी चढवावी लागते. संपूर्ण राज्यामध्ये थॅलेसेमिया रुग्णांची संख्या 14 हजारांपेक्षा जास्त आहे. या गंभीर आजाराचे जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. जगण्यासाठी या रुग्णांना वारंवार बाहेरचे रक्त शरीरात घ्यावे लागते. या बाहेरुन चढवलेल्या रक्तातील आयरन रुग्णांच्या शरीरात वाढते. त्यामुळे काही धोके निर्माण होतात. त्यासाठी या रुग्णांना न चुकता नियमितपणे औषधे ही घ्यावीच लागतात. या रुग्णांसाठी शासन मोफत रक्त उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर शासनाकडून थॅलेसेमिया रुग्णांना औषधेही मोफत देण्यात येतात. त्यामुळे या रुग्णांच्या कुटुंबीयांवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्य औषधांचा साठा संपला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने राज्य रक्तसंक्रमण विभागाकडे या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी वारंवार केली आहे. परंतु, शासकीय पातळीवर अनागोंदीचा कारभार सुरू असल्याने औषध पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे थॅलेसेमिया रुग्णांचे औषधांविना हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालय हे या आजाराच्या औषधांचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य केंद्र आहे.. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच सोलापूर, पंढरपूर, सांगली, बेळगाव, कर्नाटक, पुणे, बारामती, अकलूज, मुंबई अशा अनेक शहरांमधून व जिल्ह्यांतून औषधे नेण्यासाठी थॅलेसेमिया रुग्णांचे पालक सातार्‍यात येतात. गेल्या अडीच महिन्यांपासून थॅलेसेमियाची औषधे येथे उपलब्ध नसल्यामुळे या सर्व ठिकाणच्या रुग्णांची फरपट होत आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy