सातारा : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार्या, जुनियर मुलांच्या (15 वर्षा खालील) सातारा जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शानभाग स्कूल, सातारा मैदानावर सकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. शिवराज गायकवाड यांनी दिली.
दि. 1 जानेवारी 2010 नंतर व दि. 31 डिसेंबर 2011 या दरम्यान जन्म झालेल्या व सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येईल. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी आपला जन्मतारखेचा ओरीजिनल दाखला व आधारकार्ड सह निवड चाचणीस उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी प्रा. गौरव जाधव मो. नं. 9765700049, प्रा. अभिषेक कदम मो. नं. 9665252575, रामनाथ वायफळकर, मो. नं. 7888044755 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष धनराज जाधव यांनी केले आहे.
