‘स्लीप पॅरालिसिस’ म्हणजे काय? जाणून घेऊया सविस्तर
काहीवेळा झोपेतून अचानक जाग येते, मात्र शारीरिक हालचाली होत नाही. कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काहीच हालचाली होत नाही. संपूर्ण शरीर जड झाल्यासारखे वाटू लागते. तर काहींना भूतकाळातील स्वप्नात असल्याचा भास होतो. या स्थितीला ‘स्लीप पॅरालिसिस’ म्हणून ओळखले जाते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लीप पॅरालिसिस झाल्यानंतर कोणती लक्षणे उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
भारतासह जगभरातील इतर सर्वच देशांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यासंबंधित आणखीन गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काहीवेळा झोपेतून अचानक जाग येते, मात्र शारीरिक हालचाली होत नाही. कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काहीच हालचाली होत नाही. संपूर्ण शरीर जड झाल्यासारखे वाटू लागते. तर काहींना भूतकाळातील स्वप्नात असल्याचा भास होतो. या स्थितीला ‘स्लीप पॅरालिसिस’ म्हणून ओळखले जाते. शरीरामध्ये ही स्थिती निर्माण झाल्यानंतर झोपलेल्या व्यक्तीला झोपेतून जाग होताना किंवा झोपताना शरीराच्या कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ‘स्लीप पॅरालिसिस’आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
स्लीप पॅरालिसिसची लक्षणे:
स्लीप पॅरालिसिस झाल्यानंतर शारीरिक हालचाली पूर्णपणे थांबून जातात. तुम्ही झोपेत जागे असताना किंवा अंथरुणावर पडून असताना सुद्धा तुमच्या शरीराची हालचाल होत नाही. मेंदूला जाग येते मात्र शरीर झोपलेल्या अवस्थेमध्ये तसेच राहते. शरीरात ही स्थिती काही सेकंदांपूर्ती किंवा मिनिटांसाठी मर्यादित असते. पण रात्रभर किंवा काही दिवस हा त्रास जर तुम्हाला सतत होत असेल तर योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेणे गरजेचे आहे.
