Explore

Search

April 8, 2025 12:22 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Web Series : “मानवत मर्डर्स” मधील सई ठरतेय आजच्या पिढीतली स्मिता पाटील!

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “मानवत मर्डर्स” या सीरिजची. सत्य घेटनेवर आधारीत असलेल्या मानवत मर्डर्सने प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध केले आहे. आणि यातली “समिंद्री” अर्थात सई ताम्हणकर पुन्हा एकदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना यामधील सईची भूमिका प्रचंड आवडली आहे.

2024 वर्ष सई साठी अनेक कारणाने खास ठरले आहे. ते म्हणजे वैविध्यपूर्ण भूमिका आणि कमालीचे नवीन प्रोजेक्टया कारणांमुळे त्यातीलच एक प्रोजेक्ट हा मानवत मर्डर्स. सीरिजच्या प्रत्येक फ्रेममध्ये सईने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे, पण सगळ्यात लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे सईचा लुक आणि तिची भाषा. सईने या आधी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं होत ही भूमिका तिच्यासाठी किती आव्हानात्मक होती आणि तिने त्यासाठी खूप कष्टदेखील केले आहेत. भाषा आणि लुक या दोन गोष्टीचा समतोल साधत सईचा अभिनय हा सगळ्यांच्या मनात घर करून गेला आहे.

तर विश्लेषकांनी सईचं विशेष कौतुक केलं आहे. “सई ताम्हणकरने रंगवलेल्या समिंद्रीला तोड नाही. बोलीभाषेपासून वेषभूषेपर्यंत सई प्रत्येक बाबतीत चमकली आहे. आणि या सगळ्या गर्दीत सई ताम्हणकरने साकारलेली समिंद्री अधिक लक्ष वेधून घेते आहे” असं त्यांनी म्हटले आहे.

विश्लेषकाच्या सोबतीने सईच्या मित्रमंडळींनीदेखील तिच्या नव्या भूमिकेचं खूप कौतुक केले आहे. मग ते सुबोध भावे पासून भारती आचरेकर अशा अनेक कलाकारांनी सईला फोन मेसेज करून तिची प्रशंसा केली आहे. तसेच सोशल मीडियावर समिंद्रीचे कौतुक केले जात आहे. सई आजच्या काळातली स्मिता पाटील आहे असं खूप जणांचं म्हणणं असून अश्या अनेक कॉम्प्लिमेंट तिला मिळाल्या आहेत. सई या लुकमध्ये अगदी दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासारखी दिसते अशी देखील तुलना या निमित्ताने होत आहे.

कलाकार एखादी भूमिका साकारताना तिचा खोलवर अभ्यास विचार करतो असं म्हणतात पण खरंच सई तिच्या प्रत्येक लुकवर विचारपूर्वक अभ्यास करून ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते आणि दमदार परफॉर्मन्स देऊन जाते आणि म्हणून प्रेक्षकांना सई अधिक भावते. केवळ सौंदर्याची खाणच नाही तर अभिनयामध्येही सई जबरदस्त आहे हेच अनेकांचे म्हणणे आहे. येणाऱ्या काळात सई बॉलिवूडसह मराठीत अनेक कमालीच्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. डब्बा कार्टेल, ग्राउंड झिरो, अग्नी, मटका किंग, गुलकंद अशा अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये ती कोणत्या वेगवेगळ्या भूमिका साकारणार हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy