Explore

Search

April 13, 2025 12:55 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा

सातारा : झेडपीच्या ठराव समिती सभेत जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्याबाबत करण्यात येणार्‍या कामांवर चर्चा करण्यात येऊन मंजुरी देण्यात आली. तसेच शाळांच्या नवीन खोली बांधकामाबाबतही चर्चा करण्यात आली. ही सभा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतचे प्रभारी सतीश बुध्दे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रज्ञा माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी मोहसीन मोदी, अमर नलवडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

ठराव समितीत प्रथम मागील 24 सप्टेंबरच्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याबाबत विचार करण्यात आला. तसेच मागील ठरावावरील कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर बांधकाम विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये बामणोली, उंब्रज, हेळगाव, वडगाव हवेली, कुडाळ आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी प्रसुतीगृह विस्तारीकरण, मुख्य इमारत दुरुस्ती, आवश्यकतेनुसार विद्युतीकरण, रंगकाम, फरशी आदी कामांसाठी प्राप्त दरानुसार निविदा स्वीकारण्याबाबत मान्यता देण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 207 हातपंपांची दुरुस्ती करण्याच्या दरासही मान्यता देण्यात आली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy