अमिताभ बच्चन यांनी दिला एक अनमोल सल्ला!
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा रियालिटी शो कौन बनेगा करोडपती सीझन 16 सध्या चर्चेत आहे. शोचे पुढचे पाहुणे दुसरे कोणी नसून बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान असणार आहेत. हे दोघेही बिग बींच्या वाढदिवसानिमित्त KBC च्या मंचावर काहीतरी खास करणार आहेत. आणि अमिताभ बच्चन यांना खास भेट देणार आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस हे केवळ एक सेलिब्रेशन उरलेले नाही, तर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती बघणाऱ्या लक्षावधी लोकांसाठी या मेगास्टारला आदरांजली वाहणे ही एक सुंदर परंपरा झाली आहे. या शुक्रवारी ‘महानायक का जन्मोत्सव’ या विशेष भागात बॉलीवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमीर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित लागणार आहे.
खेळ चालू असताना अमिताभ बच्चन यांनी ‘महाराज’ या चित्रपटासाठी अभिनेता जुनैद खानचे कौतुक केले. आणि त्यानंतर आमिर खान यांना विचारले की, ‘आपल्या वडिलांच्या चित्रपट उद्योगातील व्यापक अनुभवातून तो काय शिकला.’ या प्रश्नाचं उत्तर देताना काहीशा औपरोधिक शैलीत आमीर खान म्हणाले, “सुरुवातीला मी जुनैदला हा चित्रपट करू नकोस असे सांगितले होते, कारण त्याने अनेक स्क्रीन टेस्ट दिल्या होत्या आणि प्रत्येक वेळी त्याला नकार मिळाला होता. पण महाराज मध्ये मात्र त्याची निवड झाली, त्यामुळे मला वाटले की, त्याने हा चित्रपट करू नये.” असे अमीर खान यांनी सांगितले.
त्यावेळी जुनैदने वडील अमीर खान यांना सांगितले होते की हा एकमेव चित्रपट त्याला मिळाला आहे, आणि जर हा त्याने केला नाही तर अभिनयाची सुरुवात तो कशी करणार? जुनैद पुढे म्हणाला, “मला थिएटर स्कूलमध्ये जायची इच्छा होती आणि वडीलांनी त्याला संमतीही दिली. आणि मला एक मौल्यवान सल्ला दिला अनुभवाने तू अभिनय कुठेही शिकू शकतोस. पण जर तुला भारतीय चित्रपट उद्योगात यशस्वी व्हायचे असेल, तर तुला हिंदी भाषा आणि आपल्या देशाची संस्कृती नीट समजली पाहिजे. देशातल्या लोकांना तू भेटले पाहिजे. तरच, तू मोठा अभिनेता होशील!” असे अमीर खान यांनी मुलगा जुनैदला सांगितले.
पुढे आमीर खान म्हणाले, “मी त्याला बसने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करण्याचाही सल्ला दिला. त्याला काही काळ स्थानिक लोकांसोबत राहायला सांगितले, त्यांच्या संस्कृतीशी ओळख करून घ्यायला सांगितले. मी त्याला म्हटले, हा प्रवास तुला ते शिकवेल, जे कोणतीही शाळा किंवा कॉलेज शिकवू शकत नाही.” असे अभिनेता म्हणाला.
आमीरने जुनैदला दिलेल्या सल्ल्याशी सहमत होत अमिताभ बच्चन म्हणाले, “अभिषेकला देखील मी हाच सल्ला दिला होता. मी त्याला गावातल्या लोकांसोबत मिळून मिसळून दोन तीन महीने तिथेच राहण्याचा सल्ला दिला होता कारण मला वाटते की, त्यामुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीला खूप मदत होऊ शकते.” असे अमिताभ बच्चन म्हणाले. यावरून हे स्पष्ट होत आहे की दोनीही दिग्गज अभिनेत्यांनी त्यांचा काळ गाजवून झाल्यानंतर सिनेमासृष्टीत काम करण्यासाठी काय उपयोगी आहे आणि काय नाही याचा खास सल्ला आपल्या मुलांना दिला. हा एपिसोड 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस स्पेशल म्हणून प्रसारित केला जाणार आहे.
