Explore

Search

April 8, 2025 12:27 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood New : ‘बिग बीं’च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज

४६ वर्षांनंतर ‘या’ गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांना ओळखले जाते. जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. १९६९ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज ११ ऑक्टोबरच्या दिवशी ‘बिग बी’ त्यांचा ८२ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे.

‘मीड डे’ला दिलेल्या मुलाखतीत आनंद पंडित यांनी याबाबत खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “हा चित्रपट म्हणजे अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याच्याकडे काहीही नसताना तो शहराची वाट धरतो आणि स्वत चं वेगळं विश्व निर्माण करतो. त्रिशूल-२ मध्ये विजयचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. पुढे त्यांनी सांगितलं, जर त्रिशूल- बनवला गेला तर अमिताभ बच्चन आणि अशोक पंडित पाचव्यांदा एकत्र काम करताना दिसतील”.

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गोड सरप्राइज मिळालं आहे. याचं कारण १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिशूल’ सिनेमाचा सीक्वल येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर बिग बींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. सात हिंदुस्तानी नंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली. ‘भुवन शोम’, ‘आनंद’, ‘प्यार की कहानी’, ‘परवाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. परंतु, बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फारसे चालले नाही. १९७३ मध्ये आलेल्या ‘शहंशाह’ सिनेमाने अमिताभ बच्चन यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy