Explore

Search

April 16, 2025 1:39 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Porsche car accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी

आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.

पुणे : पुण्यात कल्याणीनगरमध्ये मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीवरील दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत त्याचा जामीन मंजूर केला होता. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर आणि महाराष्ट्रात चांगलाच संताप पाहायला मिळाला. त्यानंतर आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. दरम्यान, आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.

पुण्यातील कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून अल्पवयीन मुलाने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुण व तरुणीला चिरडलं. ही घटना घडल्यानंतर तातडीने या मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयात हजर केल्यानंतर या मुलाला न्यायाधीशांनी ३०० शब्दांचा निबंध लिही, पोलिसांवर राहून वाहतुकीचे नियम समजून घेण्याची शिक्षा सुनावली होती. त्याचा जामीन मंजूर करताना ३०० शब्दांचा निबंध लिहून देण्याची अट घातली होती. या निंबधामध्ये अपघात घडल्यानंतर काय करायला हवे किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यायला हवी यावर निबंध लिहिणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने ३०० शब्दांचा निबंध बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत सादर केला. या घटनेतील अल्पवयीन मुलाला घटनेनंतर जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाने जी भूमिका घेतली, त्यावर चौकशी समितीने आक्षेप नोंदवला.

चुका राहिल्याचे अहवालात नमूद

अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून अनेक चुका राहिल्या असल्याचे अहवालातून म्हटले होते. एवढच नाहीतर दोन सदस्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली गेली होती. महिला व बाल विकास विभागाने नेमलेल्या समितीने बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांचे जबाब नोंदवले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोन सदस्यांची चौकशी करण्याचे काम या पाच सदस्यीय पथकाला देण्यात आले होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy