तिघांपैकी सर्वात शक्तीशाली ड्रायफ्रूट कोणते? एम्सच्या डायटीशियनने सांगितले…
ड्रायफ्रूट प्रत्येक वातावरणात खाल्ले जाते. परंतु हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाणे अधिक चांगले आहे. ड्रायफ्रूटमध्ये प्रोटीन, व्हिटामिन, कॅल्शियम, पोटेशियम, फायबर, झिंक आणि इतर खनिज मुबलक प्रमाणात असतात. काजू, बादाम आणि आक्रोड यांच्यापैकी कोणते ड्रॉयफ्रूट अधिक फायदेशीर आहे.
काजू, बादाम आणि आक्रोड यांच्यात मुलबक पोषक तत्व असतात. ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) मुख्य डायटीशियन डॉ. परमीत कौर काजू खाण्यास अनेक जण प्राधान्य देतात. त्यातच काजूवर प्रक्रिया करुन म्हणजे मसालेदार काजू खाल्ले जातात. परंतु साधे काजू खाणे अधिक चांगले आहे.
काजूमध्ये सर्वाधिक प्रोटीन, व्हिटामिन ई, मिनरल, कॉपर, एंटी ऑक्सीडेंट्स, आयरन, फाइबर, कॅल्शियम, झिंक, मॅग्नीशियम असते.
बदामात फायबर, कॅल्शियम, मँगनीज, फॉस्फोरस, कॉपर, आयरन, पोटेशियम, राइबोफ्लेविन असते. ते शरीरासाठी अधिक पोषक असते.
आक्रोडमध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी एसिड, व्हिटामिन्स असते. प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, फॉस्फोरस, कॉपर, सेलेनियम, मिनरल्स, कार्बोहाइड्रेट्स, फायबरसुद्धा आक्रोडमध्ये असते. फक्त दोन, तीन आक्रोड खाल्यावर शरीरास मुबलक पोषक तत्व मिळतात. नियमित आक्रोड खाल्यानंतर रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
डॉ. परमीत कौर म्हणतात, तिन्ही ड्रॉयफ्रूट आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. त्यानंतर त्यांच्यात तुलना केल्यास आक्रोड सर्वश्रेष्ठ ड्रायफ्रूट आहे. यामुळे डॉक्टर आक्रोड खाण्याचा सल्ला देतात. दुसऱ्या क्रमांकावर बदाम आहे. काजूचा क्रमांक तिसरा आहे.
सामान्य व्यक्ती रोज 6-8 बादाम, 2-3 आक्रोड आणि 4-5 काजू खाऊ शकतो. त्यापेक्षा जास्त खाल्यास पचण्यासाठी अवघड आहे. हिवाळ्यात ड्रॉयफ्रूट असेच खाऊ शकतात. परंतु उन्हाळ्यात खाताना ते रात्री भिजवून सकाळी खावे.
