नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत
सातारा : नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल्स चा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना दिल्या होत्या. म्हस्के यांनी त्याबाबत सातारा शहराच्या डी. बी. पथकास सूचना दिल्या. त्या अनुषंगाने डीबी पथकातील स्टाफ ने सी ई आय आर पोर्टल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून चिकाटीने मोहीम राबवली. या मोहिमेतून सातारा शहरातून नागरिकांचे गहाळ झालेले आठ लाख रुपये किंमतीचे 50 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे.
या कामगिरीत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत घाडगे, रणजीत कुंभार, सुप्रिया रोमण यांनी सहभाग घेतला.
