म्हसवड : महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे.
याबाबतची तक्रार सदाशिव दादा गाढवे (रा. महाबळेश्वरवाडी) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली आहे. आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरवाडीच्या हद्दीतील गाढवेवस्ती ते महाबळेश्वरवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पाझर तलावाजवळ रस्त्याच्या बाजूने श्रीपत गाढवे हे मेंढ्या चारून घरी येत होते. तलावाजवळ त्यांना शिवतेज हा पडलेला दिसून आला. त्याच्या शरीरावर जखमा झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
