सातारा : मारहाण तसेच विनयभंगप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रीतम सोमनाथ साळुंखे रा. आंबेदरे, भोसलेवाडी, ता. सातारा यांना तसेच त्यांच्या मित्रास विटेने मारहाण केल्याप्रकरणी उमेश सुपेकर रा. कमानी हौद, सातारा आणि संकेत मोरे रा. सातारा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
दुसऱ्या तक्रारीत सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बंटी उर्फ प्रीतम सोमनाथ साळुंखे रा. आंबेदरे, सातारा आणि जैद अय्याज बागवान रा. कमानी हौद, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
