Explore

Search

April 12, 2025 7:47 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : जिभेच्या रंगाने ओळखा आजाराची लक्षणे

वेळीच करता येतील उपचार

आपण पाहिले असेल की दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर सर्वात आधी जीभ बाहेर काढायला सांगतात, जिभेच्या रंगाद्वारे त्यांना रुग्णांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. तुम्ही देखील घरच्या घरी तुमच्या आरोग्य स्थितीचा अंदाज जि‍भेद्वारे घेऊ शकता. त्यासाठी काय करायचे? चला पाहूयात.
​जिभेच्या रंगावरुन आजार कसा ओळखायचा?

जिभेचा रंग पाहून शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांचा अंदाज लावता येऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपली जीभ शरीरात अनेक प्रकारचे आजार होण्याचे संकेत देते. अनेक वैद्यकीय परिस्थितीमुळे जीभेचा आकार, रंग आणि पोत प्रभावित होऊ शकतात. काही आजारांमध्ये जिभेचा रंग हिरवा, निळा किंवा अगदी काळा होतो. तर तुमच्या जिभेच्या रंगावरुन तुम्हाला कोणती समस्या आहे आहे अचूक ओळखता येणे शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

जिभेवर दिसणारी लक्षणे ओळखा

आजकाल वाढत चाललेली निष्क्रिय जीवनशैली, आणि अयोग्य आहारामुळे अनेक आजार शरीरात घर करून बसतात. ज्यांचा सुतोवाच आपल्याला नसतोच, अगदी कालांतराने ही दडलेले आजार वयोमानानुसार बाहेर येतात, आणि त्रास देत राहतात. त्यामुळे संभाव्य आजार आणि रोग वेळेवर ओळखण्यास मदत करण्यासाठी जिभेवर दिसणारी काही लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहेत. आरोग्य तज्ञ म्हणतात, जिभेचा रंग बदलणे हे संसर्ग किंवा अनेक प्रकारच्या गंभीर आजारांसारख्या अंतर्निहित आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. आपली जीभ सामान्यतः हलकी लाल-गुलाबी असते. जर तुम्हाला यात काही असामान्य बदल दिसला तर सावध व्हा.

कोणत्या रंगाची जीभ कोणता आजार दर्शविते? जाणून घ्या

आरोग्य तज्ज्ञ सांगतात, आपली जीभ शरीरात अनेक प्रकारचे आजार होण्याचे संकेत देते. काही आजारांमध्ये जिभेचा रंग हिरवा, निळा किंवा अगदी काळा होतो. सामान्यतः, जिभेच्या रंगात थोडासा बदल निरुपद्रवी असतो. मात्र, त्यात पूर्णपणे वेगळे काही दिसत असेल तर सावध राहणे गरजेचे आहे. रंगातील बदलांच्या आधारे आरोग्याच्या समस्या कशा ओळखता येतील पाहूयात.

सफेद जीभ

काही आरोग्य स्थितींमध्ये, तुमच्या जिभेचा रंग हलका गुलाबी ते पांढऱ्या ठिपक्यात बदलू शकतो. पांढरे डाग थ्रश फंगल संसर्गाचे लक्षण असू शकतात. जेव्हा काही रोग किंवा औषधांमुळे तोंडातील जीवाणूंचे संतुलन बिघडते तेव्हा असे घडते. अशा बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण जिभेतील असे बदल ल्युकोप्लाकियाच्या समस्येमध्ये देखील दिसतात.

पिवळा किंवा नारिंगी रंग

जीभ पिवळी पडणे हे सहसा जीवाणूंच्या वाढीमुळे होते. तोंडाची स्वच्छता चांगल्या प्रकारे न केल्याने आणि तोंड कोरडे पडल्याने जिभेवर बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. 2019 च्या अभ्यासानुसार पिवळी जीभ हे मधुमेहाचे लक्षण असू शकते आणि काही प्रकरणांमध्ये ते कावीळचे लक्षण देखील मानले जाते. त्याचप्रमाणे, जिभेचा केशरी रंग देखील लक्ष आजाराचे चिन्ह आहे. काही प्रतिजैविक आणि खाद्यपदार्थांमुळे जीभ नारिंगी होते. तर काही प्रकरणांमध्ये ते तोंडाच्या स्वच्छतेमध्ये अडथळा आणण्याचे हे लक्षण मानले जाते.

निळी जीभ

जिभेचा रंग हलका निळसर दिसू लागला तर हे गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण मानले जाते. साधारणपणे, असा बदल रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्ताचे विकार, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, किडनीचे आजार यामुळे जिभेवर असे बदलही तुम्हाला दिसू शकतात. एक्जिमा हे निळ्या जीभचे आणखी एक संभाव्य कारण असू शकते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy