Explore

Search

April 8, 2025 12:30 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

DJ Yogi : डीजे योगी ने केले धुमधडाक्यात गायिका चारू सेमवालशी लग्न

नवी दिल्ली  : नवी दिल्ली येथील डीजे योगी हा आज संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय आहे, जो सर्वात मोठ्या पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो. त्याच्या बीट्सने संपूर्ण देशाला आकर्षित केले आहे, परंतु केवळ सामान्य लोकच नाही तर योगी अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींचे आवडते आहेत. संगीत लोकांना जोडण्यासाठी ओळखले जाते, परंतु डीजे योगीसाठी हे आयुष्यभराचे नाते बनले आहे. कारण संगीताच्या माध्यमातूनच त्यांची चारू सेमवाल भेट झाली आणि अलीकडेच त्यांनी दिल्लीत लग्न केले आहे. योगी हा आज भारतातील आघाडीच्या डीजेपैकी एक आहे, तर चारू ही इंडियन आयडॉलची फायनलिस्ट आहे.

डीजे योगी हा आज संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय आहे. त्याच्या डिजे भल्याभल्याना थिरकायला भाग पडतो. त्याने नुकतेच गायिका चारू सेमवाल लग्न केले आहे. चारू ही इंडियन आयडॉलची फायनलिस्ट आहे.

तिच्या आवाजातील गाणी ही खूप सुपरहिट आहेत. याचदरम्यान आता डीजे योगी आणि चारूने एकमेकांसह लग्न केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते या दोघांना भरभरून प्रतिसाद देत आहे.

डीजे योगी आणि चारूचे संगीतामुळे प्रेम जोडले गेले आहे. या दोघांची पहिली भेट रिमेक गाण्यासाठी स्टुडिओमध्ये झाली होती जे गाणं चारूने स्वतः गायले होते. यानंतर या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात बददले.

डीजे योगी आणि चारूने घट्ट मैत्री आणि प्रेमानंतर लग्न करायचा निर्णय घेतला आणि या दोघांनी आता नुकतेच लग्न केले असून चाहत्यांना आश्चर्य चकित केले आहे.

त्यांनी नुकताच शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघेही खूप सुंदर आणि गोड दिसत आहेत. डीजे योगीने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर गायिका चारू सेमवालने भडक लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy