Explore

Search

April 8, 2025 1:59 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस मालिका सुरु

शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

सातारा :  दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस  ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 18 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रादेशिक  परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील.  दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

18 ऑक्टोबर रोजी चारचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील.   22 ऑक्टोबर रोजी दुचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील.   ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल.  एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील.   आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy