सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजाणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.
२६२ सातारा विधानसभा मतदार संघ एकूण मतदार – ३४१४०८ मतदार आहेत. यामध्ये पुरुष-१७०८५१, स्त्री- १७०५२०, इतर-३७ मतदार आहेत.
मतदान केंद्र सुसूत्रीकरण- नवीन मतदान केंद्र -२०, ग्रामीण १४, शहरी -६ मर्ज मतदान केंद्र – १४, शहरी- १४ ठिकाण बदल मतदान केंद्र -१५, ग्रामीण ७, शहरी- ९ एकूण केंद्र- ४६४, ग्रामीण – ३१६, शहरी-१४८, मतदान केंद्र ठिकाण – एकूण ठिकाण – ३४२, शहरी -६५, ग्रामीण-२७७.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी -३१, भरारी पथक – १४, स्थायी निगरानी पथके- १३, व्हिडिओ सर्विलेंस पथक-८, व्हिडिओ पाहणी पथक-१, स्ट्रॉग रूम ठिकाण -डीएमओ गोडाऊन एमआयडीसी सातारा, मतमोजणी ठिकाण – डीएमओ गोडाऊन एमआयडीसी सातारा. पोलिस बंदोबस्त -४६४ मतदान केंद्रावर करण्यात आला आहे. वेबकास्टींग 232 केंद्रावर करण्यात येणार आहे.
आचारसंहितेमुळे महिला लोकशाही दिन रद्द
ऑक्टोबर महिन्यात सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात होणारा महिला लोकशाही दिन विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याने संपन्न होणार नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वि.अं. तावरे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
