Explore

Search

April 8, 2025 1:59 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Amit Thakare News : अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. जागावाटप, बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरु आहे. तर तिसरी आघाडी देखील राज्यामध्ये तयारी झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील लढण्याचा इशारा दिला आहे. तर मनसे देखील या वर्षी सत्तेमध्ये सामील असेल असे सूचक विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर राजकीय पक्षापेक्षा सर्वात जास्त जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी आम्ही सत्तेमध्ये सामील होणार असल्याचा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील मनसे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक यांनी तयारी सुरु केली आहे. या संदर्भात अनेक नेते देखील राज ठाकरे व अमित ठाकरे यांची भेट घेत आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाची चर्चा रंगली असून त्यांचा मतदारसंघ देखील समोर आला आहे.

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीच लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत ही इच्छा मांडली होती. त्यानुसार, राज ठाकरे स्वतः अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाची चाचपणी करत होते. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. मात्र आता त्यांचा मतदारसंघ बदलणार असल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ,अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माहिममधील मनसे नेते पदाधिकारी कामाला लागले असून जोरदार तयारी करत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy