Explore

Search

April 13, 2025 10:23 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Crime : मुलीच्या खूनप्रकरणी बापाला जन्मठेप

पुसेसावळी : लग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही म्हणून बापाने रागाने झोपेलेल्या मुलगीचा डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात शंकर बजरंग शिंदे (वय 78, रा. औंध) या पित्यास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. तब्बल साडेबारा वर्षानंतर आरोपीस शिक्षा झाली आहे.

आरोपीने दि. 19 फेब्रुवारी 2012 ला पहाटे साडेपाचच्या दरम्यान मुलगी झोपेत असताना तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी अँगलने मारहाण करुन तिचा खून केला होता. यानंतर स्वत:च पोलिस ठाण्यात जावून कबुली दिली होती. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हाचा तपास सपोनि सी. आर. शिर्के यांनी केला होता. त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले व पुर्ण तपास करुन आरोपीविरुध्द जिल्हा न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात याकामी सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले.

या खटल्यामध्ये 11 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, सपोनि चिमणाजी केंद्रे यांनी तसेच प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलिस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, अमीर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy