सातारा : भारत सरकारच्या, राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी त्यांच्या सातारा दौऱ्यामध्ये जनता सहकारी बँक लि., सातारास नुकतीच सदिच्छा भेट दिली. प्रभु यांनी बँकेची आर्थिक स्थिती, कामकाजाचा आढावा घेवून बँकेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमुद केले. तसेच व्यस्त कार्यक्रमामुळे भविष्यात स्वतंत्र दौरा आयोजित करून बँकेस विशेष भेट देण्याचे आश्वासन बँक व्यवस्थापनास दिले.
श्री. सुरेश प्रभु यांचा सातारी कंदी पेढे, शाल व पुष्पगुच्छ देवून बँकेचे भागधारक पॅनलप्रमुख, जेष्ठ संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी यथोचित सत्कार केला. तसेच विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल श्री. सुरेश प्रभु यांनी सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी केले.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, जेष्ठ संचालक आनंदरांव कणसे, जयेंद्र चव्हाण, सौ. सुजाता राजेमहाडिक, वजीर नदाफ, मच्छिंद्र जगदाळे , ॲड. चंद्रकांत बेबले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर, सी.ए. पंकज भोसले, पुणे येथील सुप्रसिध्द पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, गायक सुरेश साखवळकर, दिपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे पदाधिकारी शिरीष चिटणीस, बँकेचे सेवक संचालक अभिजीत साळुंखे, जनता सहकारी बँकेचे कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
