Explore

Search

April 12, 2025 7:53 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात

जाणून घ्या होणारे नुकसान!

थंडीला आता पाहिजे तशी सुरूवात झालेली नाही. मात्र, थंडीला सुरूवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. काय काय नुकसान होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्वचेचं नुकसान

गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरायजरला दूर करतं. पण जास्त वेळ गरम पाणी अंगावर घेतलं तर स्किनवरील नॅच्युरल मॉइश्चर कमी होऊन स्किनचं नुकसान होतं. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन ड्राय होते आणि स्किनवर क्रॅक्स येऊ लागतात. हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इचिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

इन्फेक्शनचा धोका

हिवाळ्यात साधारणपणे त्वचा उलण्याची समस्या अधिक होते. त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे त्वचेमध्ये प्रवेश करतात. याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.

प्रजनन क्षमतेवर प्रभाव

रिसर्चनुसार जर व्यक्ती ३० मिनटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो. जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणू कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

सुरकुत्या येतात

गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुवत नसाल, पण पाण्याची वाफ चेहऱ्यावर येतेच. यामुळे स्किनचे पोर्स मोठे होतात. सोबतच स्किनचं मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात.

केसगळती

गरम पाण्याने केस आणि डोक्याची स्किन ड्राय होते. यामुळे केस सहज तुटू लागतात. याने केसगळी वाढून डोक्यात खासही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्त गरम पाण्याने केस धुवू नका किंवा आंघोळ करू नका.

गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी?

एका रिसर्चनुसार, गरम पाण्याने १० ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं. जेणेकरून स्कीन ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy