Explore

Search

April 13, 2025 10:27 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Cyclone in Bay of Bengal : ताशी 120 किमी वेगानं धडकणार चक्रीवादळ

महाराष्ट्रात हायअलर्ट

मुंबई : बंगालच्या खाडीमध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाबाबत आयएमडीकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ अंदमानच्या समुद्रावरून पुढे सरकलं असून, पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या खाडीमध्ये धडकण्याची शक्यता आहे.हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यात आहे.

आयएमडीचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी या चक्रीवादळाबाबत माहिती देताना सांगितलं की,हे चक्रीवादळ कधीही रौद्र रुप धारण करू शकते. याचा परिणाम म्हणून ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 23 ऑक्टोबर रोजी या वादळाचा वेग ताशी 40-50 किमी इतका असणार आहे, तर 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी वादळाचा वेग हा 100-110 प्रतितास इतका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान ताशी 120 किमी वेगानं वादळ धडकणार असल्यानं मच्छीमारांसाठी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस समुद्रात जाऊ नये असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy