Explore

Search

April 11, 2025 12:43 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Priyanka Chopra Jonas : फिल्मी अंदाजात प्रियांका चोप्राने साजरा केला करवा चौथ सण

ट्रॅक सूटमध्ये सोडला उपवास

प्रियांका चोप्राने निकसह लग्न केले असले तरीही ती आपल्या सर्व परंपरा जपताना दिसते. यावेळी तिने लंडनमध्ये एका अनोख्या अंदाजात करवा चौथ साजरा केला असून फिल्मीपणाही जपताना दिसली आहे.

बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सर्व अभिनेत्रीही अगदी मनापासून हा सण साजरा करताना दिसतात. यावर्षी रकुल प्रीत सिंग, परिणीती चोप्रा, शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ आणि इतर अनेक अभिनेत्रींनी पूर्ण परंपरेने करवा चौथ सण साजरा केला. त्याचवेळी लंडनमध्ये प्रियांका चोप्रानेही निक जोनाससाठी उपवास करून करवा चौथ पूर्ण केला.

प्रियांका चोप्रा परदेशात स्थायिक झाल्यानंतरही तिच्या देसी स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. रविवारी देशभरातील महिलांनी करवा चौथचा सण साजरा केला. प्रियांका चोप्रानेही हा सण लंडनमध्ये पण अनोख्या पद्धतीने साजरा केला. तिच्या करवा चौथचे काही फोटो सोशल मीडियावर तिने पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीची आकर्षक स्टाईल पाहायला मिळत आहे. तिने यावेळी वेगळीच स्टाईल करून सर्वांचे मन जिंकून घेतले.

‘सिटाडेल’ फेम प्रियांका चोप्राने लंडनमध्ये निक जोनाससोबत करवा चौथचा सण साजरा केला. त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत प्रियांकाने एका हातात चाळणी आणि दुसऱ्या हातात पूजेचे ताट घेतलेले दिसत आहे. निक प्रियांकाला पाणी देऊन तिचा उपवास सोडताना दिसत आहे. निकच्या एका हातात पाण्याचे भांडे आणि दुसऱ्या हातात मोबाईल फोन आहे, ज्यामध्ये त्याची सासू मधू चोप्रा व्हिडिओ कॉलवर दोघांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.

प्रियांकाचा क्लासी अंदाज 

प्रियंका चोप्राने तिचा करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. सहसा जेथे महिला पंजाबी सूट किंवा साड्या परिधान करतात. तर इतर अभिनेत्रींनी साडी नेसून वा भरजरी पंजाबी सूटमध्ये सण साजरा केला मात्र लंडनमध्ये प्रियांकाने ट्रॅक सूटमध्ये करवा चौथ साजरा केल्याचे दिसून आले. मात्र तिने लाल कुंकू भरले होते आणि हातात लाल बांगड्या घालत परंपराही जपलेली दिसून आली. तर हातावरही तिने अगदी लहानशी का असेना मेहंदी काढली होती.

फुल फिल्मी 

चाहत्यानी प्रियांका चोप्राच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तिला फुल फिल्मी म्हणत तिचे कौतुकही केलंय. एकाने म्हटलंय की डायरेक्ट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील सीनच वाटतोय. तर काहींनी तिचा आनंदी चेहरा पाहून तिच्यासाठी आनंदही व्यक्त केलाय. निकच्या या वागण्यालाही काहींनी अत्यंत कौतुकाने कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केलाय. तर नेटवर अनेकांनी प्रियांका आणि निकला क्यूट जोडीही म्हटलं आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy