Explore

Search

April 13, 2025 11:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime News : ‘या’ ठिकाणी इनोव्हा कार पकडली; कारमधील ‘ते’ पैसे कुणाचे

पुणे  : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा करताच राज्यातील घडामोडी वेगवान झाल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून महाविकास आघाडी व महायुतीमधील अन्य घटक पक्षांच्या  उमेदवार याद्या पुढील काही तासात जाहीर होण्याची शक्यता आहे.

२२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून त्या आधीच पुण्यात मोठं घबाड सापडलं आहे , एका कारमधून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पुण्यातील खेड-शिवापूर शिवारात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे इनोव्हा क्रिस्टा कारला राजगड पोलिसांनी काल सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनात पैशांची मोठी रक्कम होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याचं काम करत होते,  अंदाजे ५ कोटीच्या आसपास रोख रक्कम होती. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. ही वाहन कुठून आली होती याची माहिती नाही. पण वाहन सांगोला मतदारसंघात जात होती. MH 25 AS 2526 इनोव्हा क्रिस्टा ही कार अमोल शहाजीराव नलवडे या व्यक्तीची असल्याचं माहिती मिळाली आहे.

पुणे -सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सध्या खेड-शिवापूर पोलिस चौकीत वरिष्ठ पोलिस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रकमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy