स्वतःला हायड्रेट ठेवणे आवश्यक
दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने झाली तर संपूर्ण दिवस अगदी छान आनंदात जातो. बदलत्या ऋतूंनुसार वातावरणात अनेक सातत्याने बदल होत असतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. वातावरणातील बदलांमुळे आजारपण वाढते, ज्यामुळे अनेक लोक खूप जास्त चिडचिडी होतात ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहणे गरजेचे आहे. लवकरच राज्यभरात सगळीकडे शरद ऋतूला सुरुवात होणार आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात घट झाल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर दिवसभर उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
नेहमी उठल्यानंतर सकाळी शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. ज्यामुळे किडनीचे आरोग्य निरोगी राहते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. या सोबतच तुम्ही लिंबू पाणी किंवा नारळ पाण्याचे सुद्धा सेवन करू शकता.
व्यायाम करणे :
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी प्राणायाम आणि सूर्य नमस्कार करावेत. तसेच संध्याकाळच्या वेळी चालायला जाणे. शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम आणि योगासने करावीत.
पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करणे :
शरीराला सकस आणि पौष्टिक अन्नपदार्थांची आवश्यकता असते. त्यामध्ये तुम्ही फळे, भाज्या, पालेभाज्या, ओट्स, वेगवेगळ्या फळांचे रस इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे पदार्थ खायल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
उबदार कपडे घालणे :
सर्वच ऋतूंमध्ये शरीराला न टोचणारे आणि अरारामदायी कपडे परिधान करावे. कारण असे कपडे घातल्यामुळे मूडही आनंदी राहतो आणि मन शांत राहते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यता उबदार आणि कॉटनचे कपडे परिधान करावे. ज्यामुळे थंडीचा त्रास होणार नाही.
