Explore

Search

April 12, 2025 7:40 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : पेपरात भजी खाणे किती धोकादायक

खवैय्यांना नेहमी चमचमीत खाद्यपदार्थ आवडत असतात. कुठेही गरमा गरम खाद्यपदार्थ दिसल्यास त्याची चव घेण्याचा मोह सुटत नाही. परंतु पेपरात खाद्यपदार्थ खाणे धोकादायक आहे. ते आजारांना आमंत्रण देणारे ठरणार आहे. कर्करोग (कॅन्सर) सारखा आजार त्यामुळे होण्याचा धोका आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. हेमेटोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. पेपरात खाद्यपदार्थ खाणे का घातक आहे? त्याची माहिती त्यांनी या व्हिडिओतून दिली आहे.

काय आहे त्या व्हिडिओत…

प्रसिद्ध हेमेटोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्यांवर जे पेपरात बांधून खाद्य पदार्थ मिळतात त्यात तळलेली भजी खाणे धोकादायक आहे. त्या भजीपेक्षा जास्त नुकसान तुम्हाला त्या पेपरामुळे होते. जेव्हा तुम्ही फ्राय केलेले खाद्यपदार्थ त्या पेपरात बांधतात, तेव्हा त्यातील केमिकल्स आणि इंकचे एक्सपोजर येतात. वृत्तपत्रात वॉलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंड असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

हेमेटोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता पुढे म्हणतात, वृत्तपत्र कसे बनते, ते तुम्हाला माहीत आहे का? वृत्तपत्र कसे बनतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे. त्यात धूळ, बॅक्टीरिया आणि इतर घाण असते. त्यामुळे खाद्यपदार्थला चिकटून अनेक आजार तुमच्या शरीरात जातात.

मग काय आहे पर्याय

डॉ रवी के गुप्ता म्हणाले, वृत्तपत्राऐवजी तुम्ही तुमचे खाद्यपदार्थ टिश्यू पेपरमध्ये पॅक करून घेऊ शकता. टिश्यू पेपर आता सहज सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्ही आरोग्याशी संबंधित या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केल्यास 100 वर्षे जगू शकतात. तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकता. काळजी घ्या. घरातून स्टीलची भांडी आणणे आणि त्यात अन्न ठेवणे अधिक चांगले आहे.

केमिकल इंजिनिअर असलेले मोहम्मद शकिफ आलम म्हणतात, वृत्तपत्रांमध्ये आरोग्यासाठी हानिकारक अनेक घटक असतात. त्यामध्ये ग्रेड व्हेजिटेबल ऑयल आणि बिटुमेन पिगमेंट असते. हे अन्नातून पोटात गेल्यास आजार निर्माण होतात.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy