Explore

Search

April 13, 2025 10:37 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Karad Assembly Election : निवडणुक आयोगाच्या पथकाकडुन वाहनांची तपासणी

कराड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात आजपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत.

मतदार संघात येणाऱ्या वाहनांची तपासणी करून विनापरवाना ५० हजारांपेक्षा जास्त रोकड, मद्य, शस्त्रे वाहतूक किंवा इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण आणि कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी ही माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात १३ भरारी पथके आणि १२ स्थिर पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात उंडाळे कोकरूड रोड, मालखेड फाटा व शेणोली घाट आदी ठिकाणी आचारसंहिता कालावधीपर्यंत २४ तास ही पथके तैनात राहणार आहेत.

नागरिकांनी निवडणूक आचार संहितेनुसार भरारी पथके व स्थिर पथके यांना आपल्या वाहनांची तपासणी करून देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित नागरिकांच्यावर निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल कायदेशीर गुन्हे दाखल होवु शकतो, असे निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण व दक्षिणचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हेत्रे यांनी सुचीत केले आहे.

उत्तरच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख, अनिकेत पाटील व मध्यवर्ती अधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरमध्ये १३ भरारी पथके तर १२ स्थिर पथके तैनात करण्यात आलेली आहेत. सर्व शक्यता गृहीत धरून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कराड दक्षिणमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, निवडणूक नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उंडाळे कोकरूड रोड, मालखेड फाटा व शेणोली घाट आदी ठिकाणी २४ तास ही पथके तैनात राहणार आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy