Explore

Search

April 13, 2025 10:25 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

प्रसिद्धी  माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न

सातारा : बल्क एस.एम.एस. व्हॉईस एस.एम.एस.. इलेक्ट्रॉनिक मीडिया, टिव्ही, केबल चॅनल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ व्हिज्युअल यासह सोशल मिडीयावरून देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रसिद्धपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच मतदन पूर्व दिवशी व मतदनाच्या दिवशी प्रिंट मीडियातून प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींनाही माध्यम व सनियंत्रण कक्षाकडून प्रामणीत करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

माध्यम प्रमाणिकरण समितीकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करताना प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी ३ दिवस आधी समितीकडे अर्ज करावा. तसेच, इतर व्यक्ती किंवा नोंदणी न केलेल्या राजकीय पक्षाच्या बाबतीत जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी ७ दिवस आधी समितीकडे अर्ज करावा.

विहित नमुन्यातील अर्जासह प्रचार मजकुराची दोन प्रतीत साक्षांकित संहिता (स्क्रिप्ट), प्रचार मजकुराच्या दोन पेनड्रायु/सीडी द्याव्यात. सीडी, प्रचार साहित्य निर्मिती कर्ता व प्रकाशकाचे नाव पत्ता, संपर्क क्रमांक, दिनांक सीडीमध्ये तसेच संहितेमध्ये असावे. सीडीमध्ये जुने चित्रीकरण वापरले असल्यास त्यावर संग्रहीत लिहीणे बंधनकारक आहे.

अर्जामध्ये जाहिरात निर्मितीचा व प्रसारणाचा अंदाजित खर्च, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या, केबल, रेडिओ, सोशल मीडिया यावर करावयाच्या प्रक्षेपणासंबंधीतील तपशील, जाहिरात उमेदवाराच्या लाभासाठी करण्यात येत आहे किंवा राजकीय पक्षाच्या लाभासाठी करण्यात येत आहे याबाबत सत्यापन, जर याप्रमाणे नसल्यास तशा आशयाचे प्रतिज्ञापन, सर्व प्रदाने धनादेश किंवा धनाकर्षने दिली जातील, याचे सत्यापन देणे आवश्यक आहे.

चेकलिस्ट –

1) विहीत नमुन्यातील  अर्ज. 2) उमेदवाराने प्रतिनिधी नियुक्त केला असल्यास तसे  प्रतिनिधीच्या नियुक्तीचे उमेदवाराच्या सहीचे पत्र जोडावे. 3) प्रचार मजकुराची संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत. 4) प्रचार मजकुराच्या दोन सीडी / पेन ड्राईव्ह. 5) प्रचार साहित्य निर्मिती कर्त्याचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक सीडी / पेन ड्राईव्हमध्ये नमूद असावा. 6) सीडी / पेन ड्राईव्ह प्रचार साहित्य निर्मिती खर्चाबाबत बील अदा केल्याची पावती. 7) प्रचार साहित्यामध्ये, संहितेमध्ये तसेच सीडीमध्ये प्रकाशक, दिनांक तसेच त्यांचा संपर्क क्रमांक आवश्यक. 8) सोडीमध्ये जुने चित्रिकरण वापरले असल्यास त्यावर संग्रहीत लिहीणे बंधनकारक.

राजकीय जाहिराती प्रमाणित करताना खालील बाबींना अनुमती दिली जाणार नाही 1) इतर देशांवर टीका. 2) धर्म किंवा समुदायांवर हल्ला. 3) काहीही अश्लील किंवा बदनामीकारक. 4) हिंसाचाराला उत्तेजन देणे. 5) न्यायालयाचा अवमान करणारी कोणतीही गोष्ट 6) राष्ट्रपती आणि न्यायपालिकेच्या सचोटीविरुद्ध नाराजी 7) राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता प्रभावित करणारी कोणतीही गोष्ट 8) कोणत्याही व्यक्तीच्या नावाने खासगी जीवनाच्या पैल्युवर टीका.  प्राणी मुलांच्या वापरावर प्रतिबंध, संरक्षण कर्मचाऱ्यांची छायाचित्रे आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्या कार्यांची छायाचित्रे या बाबींचे तंतोतंत पालन करावे.

निवडणूक निर्भयपणे व पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी पेड न्युज प्रकरणांनाही आळा घालणे आवश्यक आहे. माध्यमांनी पेड न्युज सारखे प्रकार संपूर्णत: टाळावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे. माध्यम कक्षाद्वारे त्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही पद्धतीने अफवा, गैरसमज पसरु नये यासाठी माध्यमांनी त्यांच्याकडील माहितीची सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे.

या सर्व विषयाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज माध्यम व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा  जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुनिल पवार यांच्या उपस्थितीत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy