Explore

Search

April 13, 2025 10:38 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Phaltan News : आई बाबा प्लिज मतदान करा……!

गिरवी ता फलटण येथील विद्यार्थ्यांचे पत्रद्वारेआवाहन :  स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती

फलटण :  भारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे. लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबांना प्लीज तुम्ही  मतदान करा, असे आव्हान चिमुकल्यांनी स्वतः पत्र लिहून केले.

मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक शाळा जिल्हा परिषद गिरवी, तालुका फलटण  येथे घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने अत्यंत उत्सुकतेने पत्र लिहिले. भारताची  लोकशाही अधिक प्रगल्भ  होणे गरजेचे आहे, त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने मतदान करावे अशी नम्र विनंती पत्रा द्वारे करत आहे अशी भावनिक साद चिमुकल्यांनी घातली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदान,  लोकशाहीचा अर्थ याबाबत जागृती करण्यात आली. पत्र लेखनाचा उपक्रम त्यांनी प्रथमच अनुभवला.  प्रत्यक्ष पोस्ट कार्डवर पत्र लिहिणे हे त्यांच्यासाठी नवीन होते. त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्ग उत्साहात होता. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255  फलटण (अ.जा )विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार जनजागृती बाबत विविध उपक्रम  राबविण्यात येत आहेत . तसेच विविध पातळीमध्ये विविध घटकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे.  सदरचा मतदान जनजागृती उपक्रम नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव व स्वीप टीम यांच्या मार्गदर्शनखाली काम सुरु आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy