Explore

Search

April 13, 2025 10:36 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Nagpur News : नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमृता फडणवीसांकडून औक्षण, तर कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

नागपूर : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. तेव्हापासून राज्याचे राजकारण रंगले असून विविध घडामोडी घडत आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. काल (दि.24) गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूरमध्ये भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा दाखवून दिला आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार यावे यांसाठी शंखनाद केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची यंदाची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी घरातून आणि हजारो कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy