Explore

Search

April 13, 2025 10:38 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालयांनी सूचनांचे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

सातारा :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने   जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना   कोणतेही उल्लंघन करु नये निवडणक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे असे न  केल्यास राज्याचा संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन्स रदद करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.

कोणत्याही व्यक्तीला, दर्शनीभागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही अथवा मुद्रित किंवा प्रकाशित करवता येणार नाही.

कोणत्याही व्यक्तीला निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रक- ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे याबद्दलचे स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तोशः ओळखतात अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दिल्याशिवाय  आणि  तो दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रकाने त्या कागदाच्या एका प्रतीसह अधिकथनाची एक प्रत जिल्हादंडाधिकारी यांना पाठविल्याशिवाय मुद्रित करता येणार नाही किंवा मुद्रित करवता येणार नाही.

कागदपत्र हाताने नकलून काढण्याच्या प्रक्रियेतून अन्य कोणतीही अनेक प्रती काढण्याची प्रक्रिया म्हणजे मुद्रण असल्याचे समजण्यात येईल आणि” मुद्रक” या संज्ञेचा अर्थ तदनुसार लावला जाईल, आणि  निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक “याचा अर्थ, उमेदवाराच्या किवा उमेदवारांच्या एखाद्या गटाच्या निवडणुकीचे प्रचालन करण्यासाठी किंवा निवडणुकीला बाधा आणण्यासाठी वाटण्यात आलेले कोणतेही मुद्रितपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किंवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तिफलक असा होतो, पण निवडणूक सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर तपशील किंवा निवडणूक प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमीच्या सूचना जाहीर करणारी हस्तपत्रके, घोषणाफलक किंवा भित्तिपत्रक यांचा समावेश होत नाही.

जी व्यक्ती  कोणत्याही उपबंधाचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.

कोणत्याही निवडणुकीची पत्रके, भित्तीपत्रके व त्यांनी मुद्रीत केलेले असे अन्य साहित्य यांच्या मुद्रकांची व प्रकाशकाची नावे पत्रे मुद्रणाच्या ओळीत आहेत हे स्पष्टपणे दर्शविण्यासाठी त्यांना विशेषकरून सुचविले पाहिजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम अन्वये, आवश्यक असल्याप्रमाणे मुद्रीत साहित्याची व प्रकाशकाच्या घोषणापत्राची प्रत मुद्रकाने 3 दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पाठवावयाची आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी मुद्रणालयाकडून कोणतेही पत्रक किंवा भित्तिपत्रक, इत्यादी मिळाल्या बरोबर प्रकाशकाने व मुद्रकाने कायद्याचे व आयोगाच्या निर्देशाचे पालन केले आहे किवा कसे याची तपासणी करण्यात येवून त्याची एक प्रत, कार्यालयाच्या सूचना फलकावर सुद्धा लावण्यात येईल, म्हणजे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व अन्य इतर संबंधित व्यक्ती, कायद्याच्या शर्तीचे पालन करण्यात आले आहे किंवा कसे हे तपासू शकतील, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी डुडी यांनी कळविले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy