सातारा : विधानसभा निवडणूक 2024 साठी 17 उमेदवारांची 20 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये 258- माण मध्ये दोन उमेदवारांची 2 पत्रे, 260- कराड दक्षीण 6 उमेदवारांची 8 नामनिर्देशनपत्रे आणि 262- सातारा दोन उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे , 257-कोरेगाव 7 उमेदवारांची आठ नामनिर्देशनपत्रे अशी एकूण 17 उमेदवारांची 20 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. दि. 22 ऑक्टोंबर पासून आजअखेर 27 उमेदवारांची 33 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
258- माण विधानसभा मतदार संघातून 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये संदिप जर्नादन खरात अपक्ष, मोरे शिवाजीराव शामराव अपक्ष यांचा समावेश आहे.
260- कराड दक्षीण मतदारसंघामध्ये अतुल सुरेश भोसले भारतीय जनता पार्टी, सुरेश जयवंतराव भोसले भारतीय जनता पार्टी, गोरख गणपती शिंदे अपक्ष, विश्वजीत अशोक पाटील अपक्ष, इंद्रजित अशोक गुजर अपक्ष, रविंद्र वसंतराव यादव अपक्ष. 262- सातारा मतदार संघामध्ये वसंत रामचंद्र मानकुमरे अपक्ष, राजेंद्र निवृत्ती कांबळे अपक्ष असे दोन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. 257- कोरेगाव मतदार विधानसभा मतदार संघात जालिंदर शंकर गोडसे शिवसेना, शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार, वैशाली शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार, उद्धव आत्माराम कर्णे अपक्ष , ॲङ संतोष गणपत कमाने अपक्ष, सचिन सुभाष महाजन अपक्ष, उमेश भाऊ चव्हाण अपक्ष, जालिंदर शंकर गोडसे अपक्ष.
261- पाटण, 260 कराड उत्तर, 255- फलटण आणि 256 वाई विधानसभा मतदार संघाची आकडेवारी निरंक आहे.
