सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयात व फलटण तालुक्यातील सालपे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली.
शिवथर येथील किसनराव साबळे-पाटील विद्यालयाने रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, जनजागृती रॅली व मतदान कसे करावे यासारख्या प्रात्यक्षिकातून जनजगृती करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेऊन घेऊन व रॅलीच्या माध्यमातून घरोघरी जावून जनजागृती करण्यात आली.
दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचे आवाहन पत्र लेखन करण्यात आले या उपक्रमांमध्ये विदयार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. पालकांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहनही करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
