Explore

Search

April 13, 2025 11:06 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : छत्रपती शिवाजी संग्रहालयात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

सातारा : सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, प्रकल्पामुळे संग्रहालयाच्या वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करुन अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविण्यासाठी नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. याच धर्तीवर संग्रहालयाच्या छतावर 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. पुरातत्व विभागाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, 33 लाख 18 लाखांची तरतूदही केली आहे.संग्रहालयाच्या छतावर पुरेशी जागा उपलब्ध असून, येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. एक किलोवॅट सौर प्रकल्पातून महिन्याला 120 युनिट वीज तयार होते. त्यानुसार 50 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून महिन्याला 6 हजार युनिट वीज तयार होणार आहे. सध्या संग्रहालयातील वाघनखांसह तख्त, शस्त्र, नाणी ही दालने इतिहासप्रेमींना पाहता येत आहे. नवीन वर्षांत हे संग्रहालय पूर्णपणे सुरू होणार असल्याने विजेची गरजही वाढणार आहे. त्यामुळे संग्रहालयाला हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy