Explore

Search

April 13, 2025 10:36 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे : जरांगे पाटील

अंतरवाली सराटी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांची निवडणुकीचा फॉर्म भरण्यसाठी लगबग सुरू आहे. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यंदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तिथे उमेदवार देणार आणि जिथे शक्यता कमी वाटते, तिथे जे उमेदवार आमच्या मागण्यांना समर्थन देतील त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका मनोज  जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा या सर्व पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील

समीकरण जुळणं अत्यंत आवश्यक आहे, एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. तुम्ही इकडे गर्दी करू नका, तुम्ही इकडे गर्दी केली की मला काही काम सुचत नाही. मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे, मग राज्यात शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं. समाज निर्णय प्रक्रियेत उभा राहणार आहे का? हे बघणं महत्त्वाचं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या इतके भावी आमदार झालेत. पण मतदारसंघ कमी आहेत.  नाराज होऊन शे दीडशे भावी आमदार नाराज होतील, मात्र मी सहा कोटी मराठा समाजाला नाराज करणार नाही. दीडशे दोनशे लोकांसाठी सहा कोटी मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोठे साहेब तिथे बसले आहेत, उपसरपंचाच्या हातात सगळं आहे. फडणवीस साहेब आहेत ते सगळं सरकार जोडत आहेत. किसे कापू, छेटे, मोठे हे सगळे जोडत आहेत.  यावेळेस उपसरपंचाचा कार्यक्रम शेतकरी करणार आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy