सातारा : दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रन फॉर हेल्थ व रन फॉर ऑल” हे ब्रीदवाक्य घेवून आयोजित होत असलेली निमा रन 2024 ची तिसरी आवृत्ती साताऱ्यात पार पडली. यामधे साताऱ्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 1100 धावपटू 10 व 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर, सातारच्या पहिल्या आयर्न वूमन डॉ सुचित्रा काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते 10 व 3 किलोमीटरच्या निमा रनचा फ्लॅग ऑफ करण्यात आला.
“निमा’ या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे आयोजित होत असलेल्या या स्पर्धेत डॉक्टरांसोबतच बिगर वैद्यकीय स्पर्धक सहभागी होत असतात. लोकांना आरोग्य लाभावे व व्यायामाची सवय लागावी, या हेतूनं संघटना ही स्पर्धा आयोजित करीत असते.
यावेळी डॉ सुधीर पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ दयानंद घाडगे यांनी रेस डायरेक्टर, डॉ शुभांगी गायकवाड यांनी सचिव म्हणून व डॉ सुनिता चव्हाण यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. तर डॉ सुधाकर लाड यांनी खजिनदार पदाची जबाबदारी पार पाडली. यावेळी डॉ.माणिक जाधव, डों अनिल शिंगे, डॉ संजय नलवडे, डॉ अभिजीत देशपांडे, डॉ विठ्ठल बर्गे, डॉ अभिराम पेंढारकर, डॉ विश्वजित बाबर व डॉ रविराज निकम निमा रन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी निमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधाकर बेंद्रे, डॉ मनोहर ससाणे यांच्यासह सर्व निमा पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
डॉक्टर्स कॅटेगरी-
18 ते 30 पुरुष डॉ जयंत भिंगारदेवे 18 ते 30 महिला – डॉ नेहा भुजबळ
31 ते 40 पुरुष – डॉ गौरव साळ्खे
31 ते 40 महिला – डॉ स्नेहल शिवथरे 41 ते 50 पुरुष डॉ दतात्रय तावरे
41 ते 50 महिला – डॉ वैशाली गायकवाड
51 ते 60 पुरुष डॉ शिवलिंग राजमाने
51 ते 60 महिला -डॉ हर्षला पटवर्धन 61 व त्यापुढे पुरुष डॉ सतीश शिंदे
ओपन कॅटेगरी 18 ते 30 पुरुष – निखिल जगदाळे
18 ते 30 महिला दिशा फडतरे
31 ते 40 पुरुष किरण सकुंडे
31 ते 40 महिला – दिपाली किर्दत
41 ते 50 पुरुष – मल्लिकार्जुन पर्डे
41 ते 50 महिला – स्मिता शिंदे 51 ते 60 पुरुष रविंद्र जगदाळे
51 ते 60 महिला संगिता उबाळे
61 व त्यापुढे पुरुष – नितीन बदियानी यांना विजेतेपदाचा मान देण्यात आला या
सर्व कार्यक्रमासाठी संघटनेच्या विविध पदाधिकारी तसेच मान्यवर डॉक्टर्सनी विशेष परिश्रम घेतले.
