शायना एनसी या केवळ शिंदे गटाच्या उमेदवारच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरही आहेत. शायना मुस्लिम कुटुंबातून आल्या आहे. 18 वर्षांच्या असताना त्यांनी फॅशन डिझाईन करायला सुरुवात केली.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राजकीय पक्षांचे राजकीय डावपेचामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी. सोमवारी सकाळ अचानक भाजपमध्ये असलेल्या शायना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवेश केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. पक्षात प्रवेश करताच शायना यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून तिकीटही मिळाले.
तिकीट मिळाल्यावर काय म्हणाल्या शायना एनसी?
शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी मंगळवारी युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती नेतृत्वाचे आभार मानले मुंबईतील जनतेच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर त्या आपल्या मुंबईकरांचा आवाज सभागृहात बुलंद करणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
तर, शिवसेनेकडून आपल्या उमेदवारीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, कुठून उमेदवार उभा करायचा हे नेहमीच महायुतीचे नेतृत्व ठरवते. मला फक्त आमदार व्हायचे नाही, तर जनतेचा आवाज बनायचे आहे. मी लोकांना खात्री देते की माझ्याकडे कोणताही वैयक्तिक सहाय्यक (पीए) नाही. तरीही मी सगळ्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देते.
कोण आहे शायना एनसी?
शायना एनसी या केवळ शिंदे गटाच्या उमेदवारच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरही आहेत. शायना मुस्लिम कुटुंबातून आल्या आहे. 18 वर्षांच्या असताना त्यांनी फॅशन डिझाईन करायला सुरुवात केली. शायना एक बुटीक देखील चालवतात. त्याच्या बुटीकमध्ये अनेक नायिका म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय, जुही चावला आणि महिमा चौधरी यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे पोषाख शायना यांनी स्वत: डिझाइन केलेले आहेत. शायना यांच्या डिझाइन केलेल्या साड्या खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी सर्वात वेगवान साडी नेसण्याचा विश्वविक्रम केला आहे.
