Explore

Search

April 12, 2025 8:13 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Sport News : किलीमंजारो शिखर धैर्याने केले सर

सातारा : स्वप्नवत भरारी घेण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी अन् धैर्य. हेच बळ उराशी बाळगून अवघ्या 12 वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले. आई-वडिल, पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.

आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण करणार्‍यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते. तब्बल 5 हजार 850 मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर करावे लागते. उणे 5 ते 6 अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी, ऑक्सिजन कमी, रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर चढावे लागते.

सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागलेल्या धैर्या हिला सुध्दा किली मंजारो शिखर सतत खुनावत होते. गत एप्रिलमध्ये तिने भारतातील सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरचा बेस कॅम्प पूर्ण केला होता. तेव्हा तिला एव्हरेस्टवीर प्रियंका मोहिते, गगन हल्लुर यांची साथ, मार्गदर्शन मिळाले होते. त्यांच्या साथीने आज धैर्याने किली मंजारो शिखर पार केले. धैर्या येथील गुरुकूल स्कूलमध्ये इयत्ता 7 वीमध्ये शिक्षण घेत आहे. गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्याने सह्याद्री पर्वत रांगासह जिल्ह्यासह परिसरातील अनेक ठिकाणांनी ट्रेक पूर्ण केले आहेत.

किलीमंजारो शिखर म्हणजे मृत ज्वालामुखीच. धैर्याने 5 हजार 650 मीटर उंचीवर किलीमंजारो शिखर पार केले. दि. 25 ते 30 ऑक्टोबर या सहा दिवसात धैर्याने ही कामगिरी पार पाडली. यावेळी तिच्या सोबत प्रियंका मोहिते, गगन हल्लुर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्याने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हे शिखर पार केले. तिला किलीमंजारो नॅशनल पार्कतर्फे प्रमाणपत्रही देण्यात आले.

धैर्याची ‘एव्हरेस्ट’ कामगिरी…

गत एप्रिल महिन्यात धैर्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम पूर्ण केली होती. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी, तिही आई-वडील, पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली होती. हा कॅम्प 5545 मीटर इतका उंचीचा आहे. धैर्याने दररोज 10 ते 15 किलोमीटर असे चालत तब्बल 14 दिवसांमध्ये 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. तोही मायनस 10 डिग्री तापमानामध्ये. एव्हरेस्टवेळी वार्षिक परीक्षा असताना, तर आता सहामाही परीक्षा असतानाही तिने पहाटे चार वाजता तसेच संध्याकाळीही सराव केला आहे.

किलीमंजारो शिखर हे अतिशय आव्हानात्मक आहे. अत्यंत कमी वयात धैर्याने हे शिखर सर केले. तब्बल 78 किलोमीटर चढ-उताराचा प्रवास करताना तिने कोठेच गिव्हअप केले नाही. धैर्यामधील साहस अतुलनीय आहे. – प्रियांका मोहिते, एव्हरेस्टवीर.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy