सातारा : बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सैदापूर, ता. सातारा येथील एका आठ वर्षीय बालिकेस पाईपने मारहाण करून तिला जखमी केल्याप्रकरणी अमित पांडुरंग सनदी रा. कृष्णा कोयना अपार्टमेंट, सैदापूर, ता. सातारा याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.
