Explore

Search

April 8, 2025 2:20 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : फँड्री फेम राजेश्वरी खरात-सोमनाथ अवघडेने बांधली लग्नगाठ?

जब्या आणि शालूचा लग्नाचा फोटो व्हायरल

नागराज मंजुळेच्या फँड्री या चित्रपटातून लोकप्रिय झालेला सोमनाथ अवघडे (जब्या) आणि राजेश्वरी खरात (शालू) यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे. मुंडावळ्या बांधलेल्या आणि वधू-वर वेषात दोघे या फोटोमध्ये दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटमध्ये राजेश्वरीने आकाशी रंगाची काठपदर साडी नेसली आहे तर सोमनाछ अवघडे शेरवानीमध्ये दिसतो आहे. दोघे जण मुंडावळ्या बांधलेले दिसत आहेत.

फँड्री या चित्रपटात दोघांनी काम केलं होतं. सोमनाथ अवघडेने जब्याची तर राजेश्वरीने शालूची भूमिका पार पाडली होती. तेव्हापासून ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता लग्नाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे त्यांचे फॅनेस संभ्रमात पडले आहेत. खरचं दोघे लग्नबंधनात अडकले आहेत, का असा प्रस्न उपस्थित करत आहेत. तर आणखी काही नेटकऱ्यांना वाटत आहे की, हे फोटोज शूटिंगचे असावेत. प्रमोशनसाठी ही शक्कल लढवल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.

राजेश्वरी-सोमनाथने त्या फोटोवर कॉमेंट्सचा वर्षाव

एकाने कॉमेंट केलीय-“शूटिंग आहे मित्रांनो लाईक व्ह्यूसाठी ती मुद्दाम सांगत नाहीये.” तर काहींनी चक्क त्यांचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी म्हटलंय जोडी छान दिसते. पण रिपोर्टनुसार, जब्या आणि शालू दोघे शूटिंगमध्ये बिझी असल्याचे म्हटले जात आहे. याआधीही सोमनाथ अवघडेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राजेश्वरी सोबतचा एक फोटो शेअर केला होचाता. सोमनाथने त्या फोटोला शूटिंगचा इमोजी शेअर केला होता. शिवाय राजेश्वरीच्या हातात स्क्रिप्टदेखील दिसत होती.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy