Explore

Search

April 8, 2025 2:17 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : शाहरुख खानने सोडली घाणेरडी सवय

थेट श्वासोच्छवासावर होत होता परिणाम

वयाच्या 59 व्या वर्षी देखील लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे ‘किंग खान शाहरुख’. शाहरुखने 2 नोव्हेंबरलाच 59 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने चाहत्यांसमोर एक धक्कादायक खुलासाही केला. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त भेट आणि शुभेच्छा स्वीकारताना चाहत्यांना सांगितले की, त्याने त्याची एक अतिशय वाईट सवय सोडली आहे, जी त्याच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकत होती.

शाहरुखने जाहीर केले की, त्याने सिगारेट ओढण्याची सवय सोडली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. शाहरुख म्हणाला की, ‘मित्रांनो, आता मी सिगारेट पीत नाही. ही चांगली गोष्ट आहे. ही वाईट सवय सोडून दिल्याने, श्वासोच्छवासाचा त्रास कमी होईल अशी आशा त्याने व्यक्त केली, परंतु त्याचे परिणाम अजूनही जाणवत असल्याचे सांगितले. शाहरुख म्हणाला, ‘मला वाटलं होतं की मला श्वासोच्छवासाचा इतका त्रास होणार नाही, पण तरीही मला तसंच वाटतंय.’

शाहरुख खानने ही वाईट सवय सोडली

शाहरुखने सांगितलं की, या बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणाले, ‘इंशाअल्लाह, सर्व काही ठीक होईल’. अनेक वर्षांपासून त्याच्या धूम्रपान आणि कॅफिनच्या सवयींवर चर्चा केल्यानंतर शाहरुख खानने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी 2011 मध्ये एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या जीवनशैलीबद्दल सांगितले होते की, त्याला धूम्रपानाची सवय असून तो दिवसाला सुमारे 100 सिगारेट ओढायचा. तर 30 कप ब्लॅक कॉफी प्यायचा. पण या सगळ्यात शाहरुख जेवायला विसरायचा, तो पाणीही पित नसे.

सिनेमात व्यस्त

‘मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो, तितकीच माझी काळजी घेतली जाते’, असं देखील शाहरुख यावेळी मजेने म्हणाला. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘डंकी’मध्ये दिसला होता, त्यानंतर आता तो सुजॉय घोष दिग्दर्शित त्याच्या पुढील ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘किंग’चे शूटिंग करत आहे. याआधी अशी बातमी होती की तो या चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे, मात्र नवीन अपडेटनुसार तो किलरची भूमिका साकारू शकतो. या चित्रपटात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील दिसणार आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy