Explore

Search

April 13, 2025 12:52 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime News : साताऱ्यातील शेंद्रे येथे ९५ लाखांची रोकड जप्त

पोलीस विभाग व भरारी पथकाची संयुक्त कारवाई

सातारा  :  विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असताना सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ (शेंद्रे) येथे पोलीस विभाग आणि भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत चारचाकी मधून ९५ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

प्रांताधिकारी सुधाकर भोसले,तहसीलदार नागेश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अणि पोलीस यांच्या भरारी पथकाकडून ही संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. आज मंगळवारी शेंद्रेजवळील सोनगाव तर्फ येथे एमएच ४८ सीटी ५२३९ या चार चाकी वाहनाची पथकाने तपासणी केली असता यावेळी ९५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम पथकाने जप्त केली असून ती एका व्यापाऱ्याची असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समजले आहे.

याबाबतचा अधिक तपास प्रशासनाकडून करण्यात येत आहे.दरम्यान,या कारवाई नंतर प्रशासनाने जनतेसह सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy