Explore

Search

April 19, 2025 10:30 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : …तर माझे सर्व उमेदवार मागे घेतो

उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमचे सरकार पाडले, असे ते म्हणतात. परंतु माझे सरकार खूप चांगले काम करत होते. शेतकऱ्यांसाठी काम करत होते. मोदी म्हणतात, मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल तर सांगा मी माझे सर्व उमेदवार मागे घेईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बंर वाटल राजेंद्र गवई माझ्या व्यासपीठावर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि रा.सु. गवई यांनी मैत्री होती. त्यांनी मैत्रीत कधी राजकारण येऊ दिले नाही. मागील वेळेस जय भवानी, जय शिवाजी बोलू नये, असा आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु आम्ही ते ऐकणार नाही. आम्ही जय भवानी, जय शिवाजी बोलणार आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे.

मुंब्रात मंदिर बांधणार

देवेंद्र फडणवीस यांनी मला आव्हान दिले. मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधा? मुंब्रा काय महाराष्ट्रात नाही का? मी हे आव्हान स्वीकारतो. मी मुंब्रात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. परंतु सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मोदी यांनी माफी मागितली, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही.

मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उच्च शिक्षणसुद्धा मोफत देणार आहे. तसेच मी मुख्यमंत्री असतो तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती केली असते. उद्योगातही महाराष्ट्र मागे गेला आहे. नागपूरमधील टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तो फडणवीस यांना वाचवता आले नाही. राज्यातील सर्व काही गुजरातमध्ये जात आहे. राज्यातील युवकांना दर महिन्याला चाळीस हजार रुपये देणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy