Explore

Search

April 13, 2025 12:54 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा

बार्टीकडून साताऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन

सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मिडीयम हायस्कूल म्हणजेच सध्याचे श्री छ प्रतापसिंह ( थोरले)  हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सुनील जाधव सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळयाला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक मुकुंद गोरे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे समाजकल्याण आणि बार्टी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, समतादूत, तसेच विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके तसेच अनिल वीर, समता सैनिक दल सैनिक अभिवादन स्थळी उपस्थित होते.

सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये विद्यार्थी दिवसाचे दर वर्षी प्रमाणे यंदा बार्टीचे निबंधक,  इदिरा आस्वार, प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी यांनी शाळेचे कार्यालय, प्रयोग शाळेतील जुनी उपकरणे यांची पहाणी  केली. इंदिरा आस्वार यांनी डॉ. बाबासाहेब यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेची पाहणी करत शाळेचा वारसा जपला पाहिजे आणि शाळेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागेल ते सर्व बार्टी व सामाजिक न्याय विभाग करेल, असे मत व्यक्त केले.

बाबासाहेबांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा विजय मांडके यांनी घेतला. डॉ. बाबासाहेब यांच्यामुळे आज आपण सर्व बहुजन विविध पदांवर पोहोचू शकलो, असे सांगत इतिहासाचा आढावा घेतला. प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांनी प्रास्ताविक केले. राहुल गंगावणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विशाल कांबळे  यांनी केले. कार्यक्रमाला प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक  श्री सम्मती देशमाने यांचे विशेष सहकार्य लाभले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy