Explore

Search

April 12, 2025 7:47 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Winter Health Care Tips : हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होतो?

मग ‘हे’ उपाय नक्की करा

हिवाळा सुरू झाला असून थंडी वाढली आहे. अशा वातावरणात सर्दी-खोकल्या सारखे आजार सुरु होतात. हे आजार रोखण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी काय करावे, रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करावी किंवा वाढवावी, याविषची तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

व्यायाम आणि आहार कसा असावा?

थंडी सुरु होताच अनेकांना सर्दी होते, अशा परिस्थितीत जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्ही लवकर बरे होऊ शकता. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, तेव्हा शरीर अनेक रोग आणि संक्रमणांशी लढण्यास सक्षम असते. यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार लवकर बरे होतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्यायाम आणि आहार योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे.

थंडीचा हंगाम आणि आरोग्य

थंडीच्या हंगामात दुपारी उष्ण, सकाळ-संध्याकाळ थंड वातावरण असते. अशावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं ठरतं. कारण या बदललेल्या ऋतूमुळे सर्दी आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होण्याचा धोका वाढतो. विशेषत: ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत आहे.

खाण्या-पिण्यात होणारा बदल

खाण्या-पिण्यात होणारा बदल नेहमीच हवामानानुसार होत असतो. त्यामुळे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर आपण जे काही खातो, त्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.

बदलत्या ऋतूत रोगप्रतिकारशक्ती कशी चांगली ठेवता येईल, याबद्दल दिल्ली सरकारचे मुख्य आयुर्वेदिक अधिकारी डॉ. आरपी पराशर यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. रोगप्रतिकारक यासाठी तुम्ही आले, लवंग, काळी मिरी आणि हळद यांचा आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकता.

आले : थंडीत तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन करू शकता. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक पोषक घटक असतात. अशावेळी आल्याचे सेवन केल्यास संसर्ग टाळण्यास मदत होते. याशिवाय आल्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.

हळद : थंड हवामानात दुधात हळद घालून तुम्ही याचे सेवन करू शकता. हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. याशिवाय हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे जखमेच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतात.

काळीमिरी : काळी मिरीमध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि पाचक गुणधर्म असतात. दुधात आले आणि काळी मिरी मिसळून पिऊ शकता. याशिवाय आले आणि काळा दुधात मिसळून पिऊ शकता. काळी मिरी आले आणि मधात मिसळता येते. त्याचबरोबर काळी मिरी पावडर बनवून तुम्ही सूप किंवा कोशिंबीरमध्येही खाऊ शकता. तुम्ही चहामध्ये काळी मिरी घालून पिऊ शकता.

लवंग : लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त अनेक पोषक घटक असतात. अशावेळी तुम्ही लवंगचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आपण लवंगाच्या 2 ते 3 कळ्या चावू शकता. याशिवाय लवंग पावडर दुधात मिसळून किंवा भाजीपाला, ब्रेड किंवा कोशिंबीरमध्ये मिसळून खाऊ शकता. लवंग पावडरमध्ये मध मिसळून ही सेवन करता येते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy