पंढरपूर : यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपत्र झाली. यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर यांना मानाच्या वारकरीचा मान मिळाला.
आषाढी एकादशीनंतर, मोठी आणि महत्त्वाची अशी कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूरच्या विठुरायाला ही तिथी समर्पित असून आज पंढरपूरात उत्सव पर्व साजरा होत आहे. या उत्सवाची सुरुवात शासकीय महापूजेने झाली. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर यांना मानाच्या वारकरीचा मान मिळाला.
दरवर्षी प्रक्षेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करतात. मात्र, पंदा राज्यात विधानसभा निवडणूक सुरु आहे. निवडणूक काळात आचारसंहिता सुरू असल्यानं यंदाच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांऐवजी पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आला. त्यांनी सपलीक या महापूजेत सहभाग घेत महापूजा केली.
पंढरपूरात पांडुरंगाच्या कृपेनंच महापूजा करण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलंय, योगायोगानं आचारसंहिता सुरू असल्यानं हा योग जुळून आला. मी बालपणापासून विठुरायाच्या दर्शनाला येतो, प्रत्येकवेळी एक वेगळं समाधान आणि आनंद विठ्ठल दर्शनानं मिळत होता. मात्र, पंदाचा अनुभव खूपच खास आहे. शासनाचा आदेश मिळाला आणि आपल्याला महापूजेचा मान मिळाल्याचं डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं. महाराष्ट्रातील जनतेला चांगलं आरोग्य लाभो, आनंदमयी जीवन होवो, असं साकडं विठुरायाला घातल्याचं त्यांनी सांगितले. तसेच निवडणूक शांततेनं पार पडावी ही मनातील इच्छा पांडुरंग चरणी मांडल्याचेही पुढे बोलताना डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितलं.
दरम्यान, यंदाच्या विठुरायाच्या महापूजेतील मानाचे वारकरी सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून आपला चरितार्थ चालविणाऱ्या या कुटुंबियांना पंदाचा मान मिळाला आहे. आज कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पहाटे सुरुवातीला होणारी देवाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तर देवाची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री पांच्या हस्ते पार पडली. यानंतर पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पांच्या हस्ते सपलीक विठूरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली. यावेळी मानचे वारकरी दाम्पत्य म्हणून बाबुराव सगर आणि सागरबाई सगर उपस्थित होत्या.
कार्तिकी सोहळा म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी उत्सवाची पर्वणीच, यानिमित्त दरवर्षी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. पंदाही फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभान्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. दरम्यान, कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले असून विठुनामाच्या जयघोषानं पंढरपूर नगरी दुमदुमली आहे.
