Explore

Search

April 19, 2025 10:24 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : भोरची बारामती करण्यासाठी आम्ही तुमचे हात धरले होते का?

संग्राम थोपटेंचा अजित पवारांना सवाल

तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असताना भोरला निधी देताना आखडता हात ठेवून निवडणुकीवेळी आमच्या बारामतीसारखा विकास पाहा, अशी वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहात. मात्र, भोरची बारामती करण्यासाठी आम्ही तुमचे हात धरले होते का, असा सवाल करत अजित पवाराच्या टीकेला आ. संग्राम थोपटे यांनी प्रतिउत्तर दिले. महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ शहरात कोपरा सभा घेण्यात आल्या. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

या वेळी विठ्ठल शिंदे, विठ्ठल आवाळे, चंदन कोळसकर, निर्मला आवारे, सुरेखा भेलके, हसिना शेख, तृप्ती किरवे, वृषाली घोरपडे, जयश्री शिंदे, सुनीता बदक, रूपाली कांबळे, जयवंत शेटे, सुमंत शेटे, सचिन हर्णसकर, रामचंद्र आवारे, चंद्रकांत मळेकर, बजरंग शिंदे, प्रमोद कुलकर्णी, बंडू गुजराथी, विश्वनाथ रामण, तुषार घोडेकर, राजेश शिंदे, शिरीष चव्हाण, अनिल पवार, प्रशांत जाधव, गणेश पवार, हनुमंत कंक, विशाल तुगंतकर, शुभम शेटे, सचिन तारु, महेश शेटे आदींसह शहरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोपटे म्हणाले, महाविकास आघाडीतून भोर शहराचा विकास करण्यात आला. चौथ्यांदा संधी देऊन आपल्या मतदारसंघात काम करण्याची पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन आ. थोपटे यांनी केले. बारामतीचा विकास झाला म्हणजे राज्याचा विकास झाला, असे विरोधकांना स्वप्न पडत असताना त्यांनी इच्छुक उमेदवारांना डावलून महाविकास आघाडीला उमेदवारी देऊन भोर-मुळशीमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू केले आहे. मी विकासकामे करत असताना तिन्ही तालुक्याला समान निधी देऊन विकासकामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास मिळवला असल्याचे आ. थोपटे यांनी सांगितले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy