जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
बदाम हे तेज बुद्धासह अनेक आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. पण बदाम खाण्याची एक योग्य पद्धत आहे, ज्याच पालन केल्यास तुम्हाला बदाम खाण्याचे दुप्पट फायदे मिळतात. एवढंच नाही तर वयानुसार बदामाचं सेवन केलं पाहिजे. मात्र अनेकांना माहिती नाही वयानुसार किती बदाम खायला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, बदाम खाण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे.
एका दिवसात किती बदाम खावेत?
बदामापासून आपल्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी एका दिवसात किती बदाम खावे हे तुमचे वय, शारीरिक हालचाली आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलं दररोज 2-4 बदाम खाऊ शकतात.
12-17 वर्षे वयोगटातील लोक दिवसातून 5-9 बदाम खाऊ शकतात.
18 वर्षांवरील लोक दिवसातून 7-8 बदाम खाऊ शकतात.
याशिवाय, त्याच्या सेवनाचे प्रमाण देखील आपल्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुमची पचनक्रिया मजबूत असेल तर तुम्ही एका दिवसात सुमारे 20 बदाम खाऊ शकता. बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून रिकाम्या पोटी सेवन करा.
बदाम खाण्याचे फायदे
बदामात व्हिटामीन ई, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन बी-12 असते. यात रायबोफ्लोबिन असते. यात आयर्न, पोटॅशियम, जिंक,फॉलेट आणि व्हिटामीन बी असते. यातून शरीराला बरीच ताकद मिळत आणि पीरिएड्स क्रॅप्म्सही उद्भवत नाहीत. बदाम डायजेशन सुधारण्यासाठी आणि मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगले असते. यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे बीपी, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
